संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

13 वर्षांत ‘हा’ स्टॉक 12.18 रुपयांवरून 2000 रुपयांवर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बाळकृष्ण इंडस्ट्रीज या बहुराष्ट्रीय टायर उत्पादक कंपनीचे शेअर्स गेल्या 13 वर्षांत 12.18 रुपयांवरून वाढून 2000 रुपये प्रति शेअरपर्यंत पोहोचले आहेत. या 13 वर्षांच्या कालावधीत हा शेअर 16320 टक्क्यांनी वाढला आहे.

महत्त्वाचे म्हणजे गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 20 टक्क्यांनी घसरला आहे. 2022 मध्ये आतापर्यंत तो 2327 रुपयांवरुन 2000 रुपयांवर आला आहे. म्हणजेच 2022 मध्ये आतापर्यंत या शेअरच्या किंमतीत सुमारे 14 टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच एका वर्षात या स्टॉकमध्ये सुमारे 22 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत तो 1640 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत वाढला. तसेच पाच वर्षांत 700 रुपयांवरून 2000 रुपयांपर्यंत वाढला आहे. याचाच अर्थ हा स्टॉक 5 वर्षांत सुमारे 185 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर गेल्या 10 वर्षांत हा स्टॉक 125 रुपयांवरून वाढून 2000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर गेल्या 13 वर्षांत हा स्टॉक 12.18 रुपयांवरून 2000 रुपयांवर आला आहे म्हणजेच गेल्या 13 वर्षांत त्यात 164 पट वाढ झाली आहे.

दरम्यान, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 1 लाखांऐवजी 80 हजार मिळाले असते. तसेच एखाद्या व्यक्तीने 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 2.85 लाख रुपये मिळाले असते. त्याचबरोबर एखाद्याने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 16 लाख रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे 13 वर्षांपूर्वी जर कोणी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याला 1.64 कोटी रुपये मिळाले असते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami