मुंबई -अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यावेळी शेअर बाजाराच्या नजरा सरकारच्या घोषणांकडे लागल्या होत्या. आज भारतीय शेअर बाजार तेजीत उघडले. अर्थसंकल्पीय भाषणानंतर सेन्सेक्समध्ये सुमारे 1000 अंकांची वाढ दिसून आली. त्यानंतर त्यात घट झाली. सेन्सेक्स 400 हून अधिक अंकांनी घसरून 60,000 च्या खाली व्यवहार करत आहे. त्याचवेळी निफ्टी 17600 च्या खाली कोसळला आहे.
हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाचे समभाग – अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन, अदानी विल्मर, एसीसी आणि अंबुजा यांच्यावर दबाव आहे. अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर २५% वाढीसह २२०० च्या जवळ आला आहे.मंगळवारी ) शेअर बाजारात तेजी होती. सेन्सेक्स 49 अंकांच्या वाढीसह 59,549 च्या पातळीवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टीने 13 अंकांच्या वाढीसह 17,662 चा स्तर गाठला होता. सलग दुसऱ्या दिवशी बाजारातील ही वाढ होती. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 15 समभागांमध्ये वाढ झाली. त्याच वेळी, केवळ 15 समभागांमध्ये घसरण झाली.अमेरिका स्टॉक निर्देशांक मंगळवारी 1% पेक्षा जास्त बंद झाले. जपान, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँगच्या बाजारातही आज तेजी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे रुपयाबद्दल बोलायचे झाले तर मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 41 पैशांच्या घसरणीसह 81.93 वर बंद झाला.