UPSC Notification 2025: केंद्रीय लोक सेवा आयोगाने (UPSC) ने सिव्हिल सेवा परीक्षा 2025 चे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. आजपासून (22 जानेवारी) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना 11 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा 25 मे 2025 रोजी आयोजित केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
979 जागांसाठी निघाली जाहिरात
यूपीएससीने जारी केलेल्या नोटिफिकेशन यावर्षी भरती प्रक्रियेद्वारे अंदाजे 979 रिक्त पदे भरली जातील. यामध्ये 38 पदे दिव्यांग (PwBD) उमेदवारांसाठी आरक्षित आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत जागा कमी झाल्या आहेत. मागील वर्षी 1,056 पदांसाठी जाहिरात दिली आली होती. 2023 मध्ये 1,105 आणि 2022 मध्ये 1,022 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यूपीएससीकडून भारतीय वन सेवा (IFS) परीक्षेसाठी देखील एकूण 150 पदांची देखील घोषणा केली आहे.
अर्ज करण्याची तारीख
भारतीय नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2025 साठी इच्छुक उमेदवार आजपासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी आहे.
पात्रता
अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. तसेच, 21 ते 32 वयोगटातील उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट मिळेल.
अर्ज शुल्क
अर्ज करणाऱ्या इच्छूक उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. महिला, एससी/एसटी आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
- अर्ज करण्याची प्रक्रिया
- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
- त्यानंतर होमपेजवरील ‘Whats New’ पर्यायावर जाऊन ‘Civil Services (Preliminary) Examination, 2025’ या लिंकवर क्लिक करा.
- पुढे अर्जासाठी येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- तुम्ही पहिल्यांदा परीक्षा देत असाल, तर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा लॉगइन करा.
- त्यानंतर आवश्यक माहितीसह फॉर्म पूर्ण भरा व शुल्क जमा करून ‘सबमिट’ करा.
निवड प्रक्रिया
UPSC नागरी सेवा परीक्षेची निवड प्रक्रिया प्रारंभिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यामधून होते. इच्छुक उमेदवार आयोगाच्या वेबसाइटला भेट देऊन भरती प्रक्रिया व अर्ज प्रक्रियेबाबत अधिक जाणून घेऊ शकता.