भारताची मोठी झेप, केली तब्बल 1.55 लाख कोटी रुपयांच्या स्मार्टफोन्सची निर्यात

Smartphone Exports: भारताने स्मार्टफोन निर्यातीमध्ये विक्रम केले आहे. एप्रिल ते जानेवारी या कालावधीमध्ये भारताने 1.55 लाख कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची निर्यात केली आहे. सरकारच्या प्रोडक्शन-लिंक्ड इनसेंटिव्ह (पीआयएल) योजनेमुळे स्मार्टफोन निर्याताला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे.

प्रोडक्शन-लिंक्ड इनसेंटिव्ह (पीआयएल) योजनेमुळे आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारताने 1.31 लाख कोटी रुपयांची निर्यात केली. जानेवारी महिन्यात 25,000 कोटी रुपयांची सर्वाधिक निर्यात झाली. जानेवारी 2024 च्या तुलनेत या वर्षी जानेवारी महिन्यातील निर्यातीत 140% वाढ झाली आहे.

जानेवारीपर्यंतच्या 10 महिन्यांत निर्यात आर्थिक वर्षाच्याच्या संपूर्ण कालावधीतील 99,120 कोटी रुपयांच्या स्मार्टफोन निर्यातीपेक्षा 56% जास्त आहे. यातील जवळपास 70 टक्के योगदान काही Apple च्या आयफोन विक्रेत्यांचे होते. यामध्ये तमिळनाडूमध्ये कार्यरत असलेल्या फॉक्सकॉनचा अंदाजे अर्धा भाग होता. फॉक्सकॉनकडून निर्यातीमध्ये मागील आर्थिक वर्षाच्या संबंधित कालावधीच्या तुलनेत 43% वाढ झाली आहे.

सुमारे 22  टक्के निर्यात आयफोन व्हेंडर टाटा इलेक्ट्रॉनिक्सकडून झाली आहे. 12 टक्के निर्यात पेगाट्रॉनच्या तामिळनाडू युनिटमधून आहे. एकूण निर्यातीपैकी 20 टक्के सॅमसंगचे आहे.

सरकारद्वारे एप्रिल 2020 मध्ये पीएलआय योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेमुळे निर्यातीत दुप्पट वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये निर्यात 23,390 कोटी रुपये होती. तर आर्थिक वर्ष 2024 मध्ये हा आकडा 1.31 लाख कोटी रुपयांवर पोहोचला.