UPI Rules: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांसंदर्भातील नियमात बदल केला आहे. एनपीसीआयने चार्जबॅक प्रक्रियेसंदर्भात नवीन नियम लागू केले आहेत. 15 फेब्रुवारीपासून ऑटोमेटेड चार्जबॅक लागू करण्यातत आले आआहे. ट्रांझेक्शन क्रेडिट कन्फर्मेशन (TCC) आणि रिटर्न रिक्वेस्ट (RET) यांच्या आधारावर ऑटोमेटेड चार्जबॅक ठरवले जाणार आहे.
चार्जबॅक म्हणजे काय?
याआधी UPI द्वारे व्यवहारात काही अडचण आली आणि रिफंड मिळाला नाही, तर ग्राहकांना त्यांच्या बँकेकडून चार्जबॅक विनंती करावी लागती होती. या विनंतीची आधी वैयक्तिक पडताळणी केली जात असे व यामुळे प्रक्रियेत उशीर होत होता. पण आता, NPCI ने ही प्रक्रिया ऑटोमेटेड केली आहे, ज्यामुळे चार्जबॅक रिक्वेस्ट लवकर स्वीकारली किंवा नाकारली जाऊ शकते.
थोडक्यात, कोणत्याही कारणामुळे व्यवहार पूर्ण झाला नाही, तांत्रिक अडचण आली तरी पैसे खात्यातून वजा झाले असल्यास; अशा स्थितीमध्ये चार्जबॅकच्या माध्यमातून स्वयंचलितरित्या हे पैसे परत मिळतील.
नवीन नियम काय?
एखाद्या व्यक्तीचेe UPI व्यवहार यशस्वी झाला नाही आणि रिफंड मिळत नाही, तर त्याला पूर्वी चार्जबॅक विनंती करण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा लागला होता. हे मॅन्युअली पडताळले जात होते, ज्यामुळे जास्त वेळ जात असे. आता NPCI च्या नवीन नियमांनुसार, ट्रांजेक्शन क्रेडिट कन्फर्मेशन (TCC) किंवा रिटर्न रिक्वेस्ट (RET) च्या आधारे चार्जबॅक विनंती आपोआप स्वीकारली किंवा नाकारली जाईल. याचा अर्थ प्रक्रिया वेगवान होईल आणि वापरकर्त्यांना कमी वेळात पैसे परत मिळतील.
हा नवीन नियम 15 फेब्रुवारीपासून लागू झाला आहे. NPCI द्वारे चार्जबॅक प्रक्रिया ऑटोमेटेड करण्यात आल्यामुळे ग्राहकांना रिफंड मिळवण्याची प्रक्रिया जलद होईल. याशिवाय, बँकांसाठी ही प्रक्रिया अधिक सोयीस्कर होईल.