संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 29 March 2023

६० वर्षांपूर्वीचे कल्याण रेल्वे हद्दीतील हनुमान मंदिर तोडण्यास अखेर स्थगिती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कल्याण – कल्याण रेल्वे आरक्षण कार्यालयाच्या मागील जागेत ६० वर्षांपूर्वी बांधलेले हनुमान तोडण्यासाठी रेल्वेच्या वतीने नोटीस देण्यात आली होती.या घटनेनंतर भाविकांमध्ये खळबळ उडाली होती.त्यामुळे हे मंदिर वाचविण्यासाठी मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.त्यामुळे अखेर रेल्वे मंत्रालयाने हे मंदिर पाडण्याच्या कामाला स्थगिती दिली आहे.दरम्यान हे मंदिर पडून त्या जागेत आरपीएफचे कार्यालय बांधण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला होता.मात्र या मंदिराच्या बाजूलाच मोकळ्या जागेवर हे नवीन कार्यालय बांधले जाणार आहे.
रुपेश भोईर यांनी हे हनुमान मंदिर वाचविण्यासाठी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केल्यामुळेच रेल्वेने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.यासंदर्भात बोलताना रुपेश पाटील म्हणाले की,सुमारे ६० वर्षांपूर्वी बांधलेले हनुमान मंदिर तोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतल्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.या मंदिरात दररोज आरती होते.हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.पण या मंदिराच्या जागेवर रेल्वे सुरक्षा बलाचे नवीन कार्यालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.तशी नोटीस मंदिर संचालकांना देण्यात आली होती.या नोटिसीत सात दिवसांत कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला होता.मात्र आम्ही त्याला मनसे स्टाईलने विरोध दर्शविला आणि त्यात यशही आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या