संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

‘५० खोके एकदम ओके’चे टीशर्ट मिरवणुकीत शिंदे गटाला डिवचले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जळगाव : नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक ‘५० खोके एकदम ओके’ या घोषणेमुळे विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले होते.दरम्यान जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ’50 खोके एकदम ओके’ असे लिहिलेले टी-शर्ट परिधान करत घोषणाबाजीही केली होती. युवासेनेच्या पधाधिकाऱ्यांनी बाप्पाच्या मिरवणुकीतही शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याची संधी सोडली नाही.

युवासेनेचे विभागीय सचिव आणि युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया आहेत. युवा शक्ती फाउंडेशनच्या वतीने जळगावातील काव्य रत्नावली चौकात सार्वजनिक गणेश मूर्तींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने शहरात बाप्पाची आगमन मिरवणूकसुद्धा काढण्यात आली. यामध्ये युवाशक्तीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येकाने ’50 खोके एकदम ओके’ असे लिहिलेले टी- शर्ट परिधान केले होते. गणपती बाप्पा मोरया सोबतच ’50 खोके एकदम ओके’ अशा घोषणासुद्धा देण्यात आल्या. गणेशोत्सव काळात म्हणजे 10 दिवस हे टी- शर्ट सर्व कार्यकर्ते परिधान करणार आहेत.त्यामुळे गणेशोत्सव काळातही राजकीय कुरघोडी पाहायला मिळत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami