बीड – गेल्या ५ दिवसांपासून बीडच्या आष्टी तालुक्यातील ३८ गावचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे.यामुळे आज शेतकरी आक्रमक झाले आणि या संतप्त शेतकऱ्यांनी आष्टी तालुक्यातील अमिया टाकळी गावात असणाऱ्या विद्युत सबस्टेशनचा ताबा घेत आंदोलन केले.
बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी आमियासह ३८ गावतील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा गेल्या ५ दिवसांपासून ३३ केव्ही उपकेंद्रामधून बंद केला आहे.यामुळे शेतकऱ्यांनी चक्क ३३ केव्ही उपकेंद्राचा ताबा घेतला. विद्युत पुरवठा तात्काळ सुरु करण्याची मागणी करत शेतकरी आक्रमक झाले.यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचरण केले. तरीही शेतकरी संतप्त दिसत होते.यंदा पाऊस भरपूर झाल्याने पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र हे पाणी शेतीला देता येत नसल्याने पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत.दरम्यान, तात्काळ विद्युत पुरवठा सुरू करा.अन्यथा इथून उठणार नाही;असा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला होता.