संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

२७ ऑक्टोंबरला मध्य रेल्वेची नागपूर-मुंबई एकेरी विशेष ट्रेन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर – प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २७ ऑक्टोबरला नागपूर ते मुंबई अशी एकेरी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तिचे आरक्षण आजपासून सुरू झाले. नागपूरमधून ही ट्रेन २७ ऑक्टोबरला दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. विशेष शुल्कासह प्रवाशांना तिचे आरक्षण करता येईल, असे रेल्वेने म्हटले आहे.
दिवाळीनंतर नागपूरहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने नागपूर-मुंबई विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला. ०१०८० क्रमांकाची ही ट्रेन अतिजलद आहे. नागपूर येथून ती दुपारी १.३० वाजता सुटेल. वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण आणि दादर येथे ती थांबणार आहे. नंतर ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ४.१० वाजता पोहोचेल. या विशेष गाडीला १५ शयनयान आणि २ सामान्य दुसऱ्या वर्गाचे डबे आहेत, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. १९ ऑक्टोबरपासून तिचे आरक्षण सुरू झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami