संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

२०० याचिकांच्या सुनावणीसाठी ५ तास
जादा काम! न्यायमूर्ती शिंदे यांचे कौतुक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – न्यायालयीन कामकाजाच्या दिवशी २०० पेक्षा अधिक याचिकांवर सुनावणी होणार होती. न्यायालयाच्या निर्धारित वेळेत ती पूर्ण होणे शक्य नव्हते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने गुरुवारी ५ तास जादा काम करून त्यावर सुनावणी घेतली. त्यांच्या या कामाची दखल केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरण रिजिजू यांनी घेतली. त्यांनी न्यायमूर्ती शिंदे यांच्या खंडपीठाचे कौतुक केले. शिंदे यांच्या खंडपीठाने गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत काम केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर पॅरोल आणि फर्लो अर्जांची सुनावणी होते. गुरुवारी त्यांच्या कामकाजात २०६ याचिका कामकाज यादीवर होत्या. एका दिवसात सर्व याचिकांवर सुनावणी शक्य नव्हती हे लक्षात आल्यानंतर न्यायालयाने ५ तास जादा काम करून १९० पेक्षा जास्त याचिकांवर सुनावणी घेतली. न्यायमूर्ती शिंदे २ महिन्यांनी सेवानिवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृदाने त्यांना राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नेमण्याची शिफारस केली आहे. मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रपतींनी अद्याप घेतलेला नाही. न्यायालयाचे कामकाज सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या काळात चालते. असे असताना न्यायमूर्ती शिंदे यांच्या खंडपीठाने गुरुवारी सकाळी १०.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत काम केले. त्यांच्या या कामाबद्दल कायदा मंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami