संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

१ ऑक्टोबरपासून रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुंबईत रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ एक ऑक्टोबरपासून होणार आहे. टॅक्सीच्या किमान भाड्यात तीन रुपयांनी तर रिक्षाच्या भाड्यात दोन रुपयांनी वाढ होणार आहे. दिवसा आता टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपयांवरुन २८ रुपये होणार आहे.तर रिक्षाचे भाडे २१ रुपयांवरुन २३ रुपये होणार आहे. टॅक्सीचे रात्रीचे भाडे आता ३२ रुपयांवरुन ३६ रुपये होणारआहे. तर रिक्षाचे रात्रीचे भाडे २७ रुपयांवरुन ३१ रुपये होणार आहे.

मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून (एमएमआरटीए) या भाडेवाढीला मंजुरी देण्यात येते. त्यामुळे सरकारकडून तत्त्वत: मंजुरी मिळाल्यानंतर ‘एमएमआरटीए’ भाडेवाढीला अंतिम मंजुरी आज देणार आहे, अशी माहिती टॅक्सी युनियनने दिली आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी टॅक्सी आणि रिक्षाचालक मालकांचा संप टळला आहे. मात्र भाडे वाढ करताना इलेक्ट्रॉनिक मीटर पुनर्निर्धारित करुनच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ अंमलात आणावी, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने शासनाकडे केली आहे. मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षाचालक-मालक गेल्या काही दिवसांपासून भाडेवाढ करण्यासाठी आग्रही होते. सीएनजीचे भाव वाढत आहेत. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami