संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

१९ किलोचा कमर्शियल गॅस सिलिंडर ३२.५ रुपयांनी स्वस्त

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – नवरात्री उत्सवात हॉटेल आणि खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाली आहे. मुंबईत १९ किलोंचा व्यावसायिक गॅस सिलिंडर ३२ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाला. त्यामुळे आता तो १,८४४ ऐवजी १,८११ रुपये ५० पैशांना मिळणार आहे.
इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेडने आज गॅस सिलिंडरचे सुधारित दर जाहीर केले. त्यात घरगुती वापराच्या १४.२ किलो गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. दिल्लीत हा गॅस सिलिंडर २५ रुपये ५० पैसे, कोलकत्यात ३६ रुपये ५० पैसे, मुंबईत ३२ रुपये ५० पैसे आणि चेन्नईत ३५ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाला आहे. मुंबईत हा गॅस सिलिंडर १,८४४ रुपयांऐवजी आता १,८११ रुपये ५० पैशांना मिळणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami