संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

१५० वर्षांचा कर्नाक पूल पाडण्यासाठी १३ नोव्हेंबरला २७ तासांचा मेगाब्लॉक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*सीएसएमटी ते भायखळा रेल्वे वाहतुक बंद राहणार

मुंबई- मुंबई शहरातील सुमारे १५० वर्षे आयुर्मान पूर्ण झालेला ब्रिटीश काळातील कर्नाक पूल पाडण्यासाठी आता येत्या रविवार १३ नोव्हेंबर रोजी सीएसएमटी ते भायखळा स्थानकादरम्यान तब्बल २७ तासांचा मेगा ब्लॉक ब्लॉक घेण्याचा मध्य रेल्वेचा मानस आहे.त्यासंदर्भात मध्य रेल्वेने रेल्वे मंडळाला तशा प्रस्तावाचे पत्र पाठवले आहे.
मध्य रेल्वेच्या प्रस्तावानुसार, शनिवार १२ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून हा मेगा ब्लॉक सुरू होणार असून तो दुसर्‍या दिवशी म्हणजेच रविवारी रात्री समाप्त होईल. या मेगाब्लॉक दरम्यान काही विशेष गाड्या भायखळा ते दादर मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर वडाळापासून सोडल्या जातील. तर सीएसएमटी ते भायखळा दरम्यान नेहमी धावणार्‍या सर्व धीम्या आणि जलद गतीच्या लोकल गाड्या १७ तासांसाठी बंद ठेवल्या जाणार आहेत.त्याचप्रमाणे सीएसएमटी ते वडाळा दरम्यान याकाळात २१ तास लोकसेवा बंद राहील.तर सीएसएमटी ते भायखळा या स्थानकांदरम्यान लांब पल्ल्याच्या गाडय़ा २७ तासांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.दरम्यान,हा कर्नाक पूल पाडून या पुलाची १९ महिन्यामध्ये पुनर्बांधणी केली जाणार आहे.१८६६-६७ मध्ये हा पूल बांधण्यात आला आहे.२०१४ पासून या पुलावरील अवजड वाहतुक बंद करण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami