पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वी आणि १२ वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ७५ टक्के हजेरी बंधनकारक केली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही उपस्थिती बंधनकारक केली आहे. त्याबाबत सर्वसामान्य शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाने पत्र पाठवले आहे.
राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजमध्ये ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. त्यापेक्षा कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. नैसर्गिक आपत्तीचा याला अपवाद आहे. त्याबाबतचे पत्र मंडळाने शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना पाठवले आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होणार आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ऑनलाइन शाळा सुरू होत्या. काही दिवस शाळा बंद होत्या. काही निर्बंध होते. त्यामुळे यंदाच्या परीक्षेसाठी हा नियम लागू नाही. परंतु पुढील वर्षापासून ७५ टक्के हजेरी बंधनकारक आहे.