संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

१० वीच्या विद्यार्थ्यांनी चक्क नारळ
फोडून पेपरला सुरुवात केली!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद- माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण विभागामार्फत आजपासून दहावीच्‍या परीक्षेला सुरुवात झाली. पेपराला जाण्यापूर्वी अनेक विद्यार्थी आई– वडील, देवाच्‍या पाया पडून आशिर्वाद घेत असतात. परंतु,औरंगाबादमध्‍ये दहावीच्‍या काही विद्यार्थ्यांनी अजब प्रकार करत चक्‍क नारळ फोडून पेपराला सुरवात केली. याचा व्‍हिडीओ देखील प्रचंड व्‍हायरल झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर स्टेशन येथील विद्यार्थ्यांचा हा प्रताप आहे. पेपर सुरू होण्याच्‍या काही वेळापुर्वीच या विद्याथ्‍र्यांनी हा प्रकार केला आहे.आपले नोटपॅड बाजूला ठेवून त्याच्या शेजारी एक दगड ठेवून नारळ फोडले. यावेळी बोल भवानी की जय चा जयघोष करून नारळ फोडत पेपराला सुरुवात केली.याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या