पुणे – दहावी-बारावी परीक्षांमधील पेपरफुटी सारखे प्रकार टाळण्यासाठी यावर्षीपासून प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी मिळणार नाही असा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला होता. मात्र, याविरोधात विद्यार्थी, पालक आणि मुख्याध्यापकांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर विद्यार्थांचे हित लक्षात घेऊन प्रश्नपत्रिका दहा मिनिट अगोदर वितरीत करण्याचा निर्णय राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.
परीक्षेची सुधारित वेळ- सकाळी ११ ते दु. २: १० , सकाळी ११ ते दु. १:३० वाजेपर्यंत, सकाळी ११ ते १: ४० वाजेपर्यंत. दुपारी ३ ते सायं ६: १० वाजेपर्यंत, दुपारी ३ ते सायं ५:१० वाजेपर्यंत, दु. ३ ते सायं ५:४० वाजेपर्यंत.