संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

हॉटेलच्या भीषण आगीत ४ जण ठार खिडक्या तोडून १० जणांना वाचवले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनऊ – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील मदन मोहन रोडवरील हजरतगंज भागातील लेवाना हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर आज भीषण आग लागली. अपघाताच्या वेळी हॉटेलमध्ये जवळपास 30 लोक राहत होते.आग लागल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सुमारे 20 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र तिसऱ्या मजल्यावर 10 जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने पाच तासांच्या बचाव मोहिमेत त्यांची सुटका केली.दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ८ जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
लेवाना हॉटेलमध्ये 30 खोल्या आहेत. अपघाताच्या वेळी 18 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. अपघातापूर्वी काही लोक हॉटेलमधून निघून गेले होते. आज सकाळी 7.30 च्या सुमारास लेवाना हॉटेलमधील खोल्यामध्ये धुराचे लोट भरू लागले. धुराचे लोट पसरल्याने अनेक लोक बेशुद्ध पडले. हॉटेल कर्मचाऱ्यांना आठ वाजता याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर कर्मचारी मदतीसाठी जमले. हॉटेलच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, अनेक लोक स्वतः खिडक्या तोडून बाहेर आले. अनेक जण हातात सामान घेऊन बाहेर पडताना दिसत होते. हॉटेलमधून सुटका करण्यात आलेली एक महिला आणि एक पुरुष बेशुद्ध पडले होते. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांची ओळख पटवली जात आहे. 8 जणांना सिव्हिल हॉस्पिटल दाखल केले असून श्रवण कुमार,राज कुमार, मोना,अंश कौशिक,कामिनी,आनंद उपाध्याय,चंद्रेश, प्रदीप मौर्यल्याना अशी त्यांची नावे आहेत. जखमींची भेट घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठकही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या दुर्घटनेची लखनौचे आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना संयुक्त तपास करण्याचे आणि जखमींवर चांगले उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी यांनी दिले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami