संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

हिरव्या चिन्हात बंद झालेला शेअर बाजार आज उघडताच घसरला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – जगभरातील शेअर बाजाराच्या घसरणीचा काळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. देशांतर्गत बाजाराचीही हीच स्थिती आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवसाचा बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्ही तोट्यात गेले. आज व्यवहार सुरू होण्यापूर्वी प्री-ओपन सत्रापासूनच बाजार खाली आला होता. सत्र सुरू होण्यापूर्वी बीएसई सेन्सेक्स सुमारे ५६० अंकांनी घसरला होता, तर निफ्टीही सुमारे २०० अंकांनी खाली आला होता. सकाळी ०९:२० वाजता सेन्सेक्स २५६ पेक्षा जास्त अंकांनी घसरून ५४,६४० अंकांच्या खाली गेला होता. निफ्टीही १६,३०० अंकांच्या खाली व्यवहार करत होता. आज सेन्सेक्स ५४,७६०.२५ वर सुरू झाला, तर निफ्टी १९४.१५ अंकांनी घसरून १६,२८३.९५ वर सुरू झाला.

यापूर्वी काल, गुरुवारी तब्बल पाच दिवसांनंतर बाजारात तेजी दिसून आली. कालच्या व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स एकावेळी ५४,५०७ अंकांनी घसरला होता आणि त्यानंतर ८०० हून अधिक अंकांनी सावरला. व्यवहार बंद झाल्यानंतर सेन्सेक्स ४२७.७९ अंकांनी (०.७८ टक्के) वाढून ५५,३२०.२८ वर बंद झाला. तर, निफ्टीदेखील १२१.८५ अंकांच्या (०.७४ टक्के) वाढीसह १६,४७८.१० वर बंद झाला. दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला सर्व सत्रांमध्ये बाजार तोट्यात होता.

गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात १,७५० शेअर्सची खरेदी झाली, तर १,५५० शेअर्सची विक्री झाली. याशिवाय १३८ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. तर, आजच्या बाजारात निफ्टी ५० मधील बजाज ऑटो, एनटीपीसी हे दोन शेअर्स वाढीसह सुरू झाले, तर, विप्रो, हिंदाल्को, टाटा स्टील, टेक महिंद्रा आणि इन्फोसिससह ३७ शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami