संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

हिमाचल प्रदेशसाठी भाजपकडून 62 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शिमला- हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 62 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे सिराज मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत.या 62 जणांमध्ये भाजपने 5 जागांवर महिला उमेदवारांनी संधी दिली असून 11 विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. या जागांवर नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली.
सिराज मतदासंघातील लढत ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण काँग्रेसने याआधीच या जागेवर चेतराम ठाकूर यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यानंतर आता भाजपनेही मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली आहे. भाजपने पहिल्या यादीत पाच महिलांना उमेदवारी दिली आहे. या पाच नावांपैकी चंबा येथून धक्कादायक नाव समोर आले असून भाजपने चंबामधून इंदर कपूर यांना उमेदवारी दिली. तसेच विद्यमान मंत्री सरवीन चौधरी यांना शाहपूरमधून तिकीट दिले आहे. तसेच इंदूरमधून रीता धीमान, पच्छाडमधून रीना कश्यप, रोहडूमधून शशी बाला यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत भाजपच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. त्यानंतर भाजप हिमाचल प्रदेश निवडणुकीची यादी जाहीर करणार आलेी.
दरम्यान, हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक एकाच टप्यात होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे तर 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 8 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये कुणाचं सरकार होणार हे स्पष्ट होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami