शिमला: – हिमाचल प्रदेशमधील लाहुल-स्पीती, कुल्लू, शिमला, किन्नौर आणि चंबा जिल्ह्यांतील उंच टेकड्यांवर जोरदार हिमवृष्टी झाली आहे. हिमवृष्टी झाल्याने वाहने घसरु लागली होती. काही काळ वाहतूक थांबवावी लागली. यामुळे या जिल्ह्यांतील १२१ रस्ते बंद करण्यात आले आहेत.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार हिमवृष्टी झाल्याने या भागातील पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा सेवा विस्कळीत झाल्या होता. शिमला हवामान विभागाचे संचालक सुरेंदर पॉल यांनी सांगितले की, लाहौल आणि स्पीती जिल्ह्यातील कोकसरमध्ये १७ सेमी बर्फवृष्टी झाली आहे. शिमला १९ मिमी, मनालीमध्ये १३ मिमी, तर भरमौर आणि कोठीमध्ये प्रत्येकी ५ मिमी पाऊस पडला आहे. “गोंडला येथे १२ सेमी, कुकुमसेरी ९ सेमी आणि आदिवासी जिल्ह्याच्या प्रशासकीय मुख्यालयात ६ सेमी बर्फाची नोंद झाली आहे. शिमलाच्या बाहेरील प्रसिद्ध हिल स्टेशन कुफरी येथे १.५ सेमी बर्फवृष्टी झाली आहे.