शिमला- हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत 1 लाख लोकांना रोजगार देण्यात येईल असे काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटले आहे. तसेच काँग्रेसने महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटले आहे की, पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत 1 लाख लोकांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला जाईल. सरकार स्थापन झाल्यावर जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु होईल. जुनी पेन्शन योजना लागू करणे, 300 युनिट मोफत वीज आणि 2 रुपये किलोने शेणखत खरेदी यासह 10 हमींचे आश्वासन दिले आहे. यासोबतच फळांचे भाव बागायतदार ठरवतील, तरुणांसाठी 680 कोटी रुपयांचा स्टार्ट अप फंड, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ४ इंग्रजी शाळा, मोबाईल व्हॅनद्वारे प्रत्येक गावात मोफत उपचाराची सुविधा, पशुपालकांना दररोज 10 लिटर दूध घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही उपस्थित होते. 2500 रुपये प्रतिक्विंटल दराने धान खरेदीचे काम सुरू केल्यावर केंद्रातील भाजप सरकारने त्यात अडथळे निर्माण करण्याचे काम केल्याचे छत्तीसगढ़ मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हणाले आहे. निवडणूक जाहीरनामा समितीचे अध्यक्ष धनी राम शांडिल यांनी म्हटले आहे की, भाजपने जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत आणि पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. हा केवळ निवडणूक जाहीरनामा नसून हिमाचल प्रदेशातील लोकांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी तयार केलेला दस्तऐवज आहे. काँग्रेस सत्ताविरोधी लाटेवर अवलंबून आहे आणि मतदारांना राज्यात भाजपला पुन्हा निवडून देऊ नये असे आवाहन करत आहे.