संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

हिजाबविरोधी इराणमध्ये महिलांचे आंदोलन सुरुच

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
 तेहरान -   इराणीमधील तरुणी महसा अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन पेटले असून अनेक महिला रस्त्यावर उतरुन जोरदार ताडंव करत आहेत. उत्तर इराणमधील आंदोलनात सहभागी 450 जणांना गेल्या 10 दिवसांमध्ये अटक करण्यात आला आहे. बहुतांश सुधारणावादी कार्यकर्ते, पत्रकार आणि शेकडो आंदोलकांना रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. या आंदोलनकर्त्यांनी सरकारी इमारतींवर हल्ला चढवत सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले.  

 इराणमधील गश्त-एरशाद (संस्कृतीरक्षक पोलिसांनी) महसा अमिनी या 22 वर्षीय तरुणीला हिजाब नीट परिधान न करण्यावरून अटक केली होती. अटकेच्या पश्चात अचानक या तरुणीची प्रकृती खालावली आणि ती कोमात गेली. यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान अमिनीचा मृत्यू झाला. कट्टरपंथीय संस्कृती रक्षकांनीच अमिनीचा जीव घेतला असल्याचा आरोप करत इराणमधील महिला संतापाने पेटून उठल्या आहेत. देशभरात विविध ठिकाणी हिजाबविरोधात आंदोलन सुरु ठेवले आहे. त्यामुळे तेथे गोंधळाचे वातावरण पसरले आहे.
आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami