संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

हिंदू राष्ट्र संघटनेच्या तुषार हंबीर हल्लाप्रकरणी तीन पोलीस निलंबित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – हिंदू राष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीरवर ससून रुग्णालयामध्ये जीवघेणा १५ दिवसांपूर्वी हल्ला झाला होता.रुग्णालयात हंबीरला बंदोबस्तासाठी नेमलेले पोलिस शिपाई पांडुरंग भगवान कदम, पोलीस शिपाई राहुल नंदू माळी आणि सिताराम अहिलू कोकाटे या कोर्ट कंपनीच्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी निलंबित केले आहे.
तुषार हंबीर हल्लाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली असून त्यांची वेगवेगळ्या कारागृहात रवानगी केली आहे.महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल असलेला व हिंदू राष्ट्र सेनेचे संबंधित तुषार हंबीर याच्यावर ५ सप्टेंबर ला पावणे दहा वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयात चौघांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवित हल्ला परतविला. या घटनेत पोलिस कर्मचारी जखमी झाला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami