छत्रपूर :- ‘जेव्हा कोट्यवधी हिंदू बागेश्वर धाममधील महायज्ञात हिंदू राष्ट्राची कामना करतील, तेव्हा भारत हिंदू राष्ट्र बनेल,’ असे आवाहन धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले आहे. बागेश्वर धाम येथे रविवापपासून सात दिवसीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत अन्नपूर्णा नवकुंडिया महायज्ञ, रामकथा, वृंदावनातील कलाकारांचे रासलीला सादरीकरण आणि १२१ गरीब मुलींचा लग्नसोहळा असे कार्यक्रम होणार आहेत. शिवरात्रीच्या दिवशी १८ फेब्रुवारी रोजी बागेश्वर धाम येथे १२१ गरीब मुलींचे लग्न लावण्यात येणार आहे. गरीब मुलींचे कन्यादान धीरेंद्र शास्त्री करतील. या कार्यक्रमात भाजप नेते मनोज तिवारी देखील सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.