संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 05 February 2023

हिंगोलीत गाईंच्या तस्करांची पोलीस पथकावर दगडफेक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हिंगोली – जिल्ह्यातील वसमत ते नांदेड मार्गावर साई मंदिराजवळ गाईंची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीने आज शनिवारी पहाटे ५ वाजता गस्तीवर असलेल्या वसमत शहर पोलिसांच्या पथकावरच दगडफेक केली. यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी हवेत एक राऊंड गोळीबार केला.त्यामुळे तस्कर पिकअप वाहनासह पळून गेले. त्यांचा भरधाव वेगातील पिकअप लिमगाव शिवारामध्ये उलटले.तेथून पळ काढण्यात पाच जणांना यश आले.पोलिस त्यांच्या शोधात आहेत.

वसमत पोलीस ठाण्याचे पोलीस पथक गस्तीवर होते.आज शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गस्तीपथक वाहनासह वसमत पोलिस ठाण्यामध्ये येत होते. यावेळी पोलिसांचे वाहन पाहताच एक पिकप व्हॅन भरधाव वेगात नांदेडकडे वळले. यामुळे पोलिसांच्या पथकाला संशय आला. त्‍यामुळे पोलिसांनीही वाहनाचा पाठलाग सुरू केला. पिकअप चालकाने त्याचे वाहन नांदेड रोडवर साई मंदिर जवळ थांबवले. त्यामुळे पोलिसांनीही वाहन थांबून पिकअप जवळ जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पिकअपमधील पाच जणांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीमध्ये जमादार शिवाजी पतंगे जखमी झाले. या प्रकारानंतर उपनिरीक्षक खार्डे यांनी दगडफेक रोखण्यासाठी हवेत एक राऊंड फायर केला.यामुळे घाबरलेल्या तस्करांनी वाहनासह पळ काढला. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग सुरू केला. तस्करांच्या वाहनाने नांदेड जिल्ह्यातील लिमगाव शिवारात एका टेम्पोला धडक दिली. या अपघातामुळे पिकप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या खाली उलटले. त्यानंतर पिकअपमधील पाचही जणांनी तिथून पळ काढला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami