संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

हिंगोलीचे आमदार, खासदार हरवले शोधणाऱ्यास सव्वा रुपयाचे बक्षीस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शेतकऱ्यांच्या फलकाने खळबळ
हिंगोली – अतिवृष्टीमुळे हिंगोलीचे शेतकरी संकटात सापडले आहेत. असे असताना त्यांना वाऱ्यावर सोडून येथील खासदार व आमदार गायब झाले आहेत. या हरवलेल्या खासदार आणि आमदारांना शोधून दाखवा. सव्वा रुपया बक्षीस मिळवा, असे फलक संतप्त शेतकऱ्यांनी गोरेगावमध्ये झळकवले आहेत. त्यामुळे खळबळ माजली आहे.
हिंगोलीच्या अनेक गावांमधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. असे असताना अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात सोनगाव तालुक्यातील पुसेगाव, गोरेगाव, आजेगाव ही मंडळे मदतीतून वगळली आहेत. औंढा तालुका आणि कळमनुरी तालुक्यातील वाकोडी मंडळही वगळले आहे. त्यामुळे येथील शेतकरी संतापले आहेत. त्यांनी याच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी क्रांती समितीने आंदोलन पुकारले आहे. १२ दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. अतिवृष्टीतील मदत वाटपावरून शेतकरी आक्रमक झाले असताना आमदार तानाजी मुटकुळे आणि खासदार हेमंत पाटील तिकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी खासदार व आमदार दाखवा. सव्वा रुपये बक्षीस मिळवा, अशी फलकबाजी केली आहे. गोरेगावमधील हे फलक चर्चेचा विषय बनले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami