संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

हार्बर मार्गावर कोसळली भिंत; दोन तासांचा आपत्कालीन ब्लॉक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – काही दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. पावसामुळे मस्जिद बंदर स्थानकाजवळील भिंतीचा काही भाग कोसळला. ही भिंत रेल्वेच्या रुळांवर पडली असून वाहतूक सेवा ठप्प होऊन प्रवाशांचा खोळंबा झाला. रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी २ तासांचा आपत्कालीन ब्लॉक घेण्यात आला होता. ही घटना काल गुरुवारी ७ जुलै रोजी घडली.यावेळी सीएसएमटी ते वडाळा मार्गावर लोकल सेवा बंद करण्यात आली होती. ब्लॉकच्या दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवासी कुर्ला, दादर येथून मेनलाइनवर प्रवास करु शकतात, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

मस्जिद स्थानकाजवळ असलेल्या खासगी भिंतीचा जीर्ण भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानंतर काही मिनिटांसाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर मशीद स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्यांनी मातीचा ढिगारा बाजूला करुन रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. मात्र खासगी भिंतीचा भाग सुरक्षित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami