हैद्राबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार पर्यावरण पूरक आणि परकीय चलन वाचवणाऱ्या इंधनाच्या संशोधनात एक महत्वाचा टप्पा गाठण्यात आला. त्यामुळे आता हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस लवकरच भारतात दाखल होणार आहेत. रिलायन्ससोबत तांत्रिक सहकार्याने हायड्रोजन बसची घोषणा ऑलेक्ट्रा या कंपनीने आज केली.
मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडची उपकंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने सार्वजनिक वाहतूकीतले नेतुत्व पून्हा एकदा दाखवून दिले. पुढील पिढीची वाहतूक व्यवस्था ठरणाऱ्या नवीन तंत्रज्ञानावर आधारलेल्या हायड्रोजन बसेसचे लवकरच भारतीय बाजारपेठ आगमन होणार आहे.