संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल IPO आणण्याच्या तयारीत, SEBI कडे दाखल केला अर्ज

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदाबादस्थित बेअरिंग केज बनवणारी कंपनी हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल आपला IPO आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्यांनी SEBI कडे मंजुरीसाठी अर्जही केला आहे. या IPO तून ते ७५५ कोटी रुपये उभारणार असून ४५५ कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू असणार आहे. तर विद्यमान भागधारक ऑफर फॉर सेल अंतर्गत ३०० कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. तसेच, या ऑफरमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळा हिस्सा राखून ठेवला जाईल.

दरम्यान, ऑफर फॉर सेलमध्ये राजेंद्र शाह 66.75 कोटी रुपयांपर्यंत, हरीश रंगवाला 75 कोटी रुपयांपर्यंत, टिळक शाह 16.50 कोटी रुपयांपर्यंत, चारुशीला रंगवाला 75 कोटी रुपयांपर्यंत आणि निर्मला शाह 66.75 कोटी रुपयांपर्यंत शेअर विकतील.

या कंपनीवर २७० कोटी रुपये कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी IPOची रक्कम वापरण्यात येणार आहे. तर, मशिनरी खरेदसाठी ७७.९५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून ७.१२ कोटी रुपये पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार आहेत.

Axis Capital, Equirus Capital आणि JM Financial हे या IPO चे बुकरनिंग लीड मॅनेजर आहेत.

कंपनीची थोडक्यात माहिती

हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल ही कंपनी अहमदाबाद येथील असून या कंपनीचे ५ उत्पादन युनिट आहेत. यापैकी गुजरातमध्ये ३, चीनमध्ये १ आणि रोमानियामध्ये १ युनिट आहे. तर, या कंपनीचा IPO आणण्याचा हा दुसरा प्रयत्न असून ऑगस्ट २०१८ सालीही या कंपनीने SEBI कडे अर्ज दाखल केला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami