श्रीवर्धन – तालुक्यातील हरिहरेश्वर येथील समुद्रात पर्यटकांना सध्या डॉल्फिन चे दर्शन मिळत आहे. डॉल्फिनचे थवेच्या थवे याठिकाणच्या समुद्रात मुक्त संचार करताना आढळत आहेत.त्यामुळे आता पर्यटकांचीही या परिसरात गर्दी होताना दिसत आहे.
घोळक्याने पोहणारे आणि अधूनमधून पाण्याबाहेर उड्या मारणारे डॉल्फिन पर्यटकांना आनंद देवून जात आहेत.श्रीवर्धनच्या हरिहरेश्वर येथील डॉल्फिनचे कायमच दर्शन घडत आले आहे.हिवाळ्यात तर या ठिकाणी डॉल्फिन्सची सफर दरवर्षी अनुभवायला मिळते. त्यामुळेच हरिहरेश्वर हे एक हिमालयातील चांगले पर्यटन स्थळ बनले आहे.याठिकाणी निवांत वेळ आणि निसर्गरम्य परिसर अनुभवायला मिळतो.