संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

हत्या, तडीपारसह ११ गुन्हे असणाऱ्या कुख्यात गुंडाचा भाजपात प्रवेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चंद्रपूर : राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडत असल्याचे पहायला मिळत आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेश सुरु आहेत. परंतु, चंद्रपूर शहरातील कुख्यात गुंड व नगरसेवकाने भाजपात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीतच हा प्रवेश सोहळा पडला आहे.

सविस्तर वृत्त असे की, राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही गटांकडून इन्कमिंग सुरू आहे. अशातच चंद्रपूरमध्ये हत्या-दंगलीच्या गुन्ह्यातील माजी नगरसेवकाने भाजपात प्रवेश केला आहे. कॅबिनेटमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीतच हा प्रवेश सोहळा पडला. त्यामुळे भाजपमध्ये वाशिंग मशीन असल्याचा आरोप सतत विरोधकांकडून होत असताना, अशातच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माजी नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. मागील पाच वर्षांपासून चंद्रपूर मनपात भाजपची सत्ता आहे. महिनाभरावर येऊन ठेपलेल्या मनपा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. अशातच कुख्यात गुंड नगरसेवक अजय सरकार यांचा सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मोठ्या शानदार सोहळ्यात भाजपात पक्ष प्रवेश झाला. मात्र, धक्कादायक म्हणजे, हत्या-दंगली सारखे गुन्हे या माजी नगरसेवकावर आहे. त्यामुळे अजय सरकार यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बंगाली कॅम्प भागात अजय सरकार याचे मोठे वर्चस्व आहे. मागील वर्षभरात टोळीयुद्ध सदृश्य अनेक प्रकरणात अजय सरकार याचा सहभाग राहिला असल्याचे देखील समोर आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami