संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

हडपसरमध्ये सिमेंटचा मिक्सर रिक्षावर उलटून १ ठार, ३ जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – हडपसरच्या गाडीतळ येथे आज पहाटे ५.३० च्या सुमारास सिमेंट मिक्सर झाडावर आढळून नंतर रिक्षावर उलटून अपघात झाला. त्यात १ जण जागीच ठार झाला असून अन्य ३ जण जबर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
सोलापूर येथून सिमेंट मिक्सरचा ट्रक पुण्याकडे जात होता. आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास तो सोलापूर रोडवर हडपसर जवळच्या रवी दर्शन समोरच्या एसटी बस स्टँड जवळ आला तेव्हा चुकीच्या दिशेने आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या नादात तो झाडावर आदळला. त्यानंतर रिक्षावर उलटून अपघात झाला. त्यात रिक्षातील एक जण जागीच ठार झाला तर इतर ३ जण जखमी झाले आहेत. पहाटे झालेल्या या अपघातामुळे हडपसरच्या गाडीतळ भागात वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने क्रेनने बाजूला हटवल्यानंतर येथील वाहतूक सुरू झाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami