पुणे-जिल्ह्यातील हडपसर येथील हांडेवाडीमधील चिंतामणी परिसरात असलेल्या भाजी मंडईत काल मध्यरात्री भीषण आगीची घटना घडली.या आगीत भाजीपाल्याचे १० स्टॉल आगीत भस्मसात झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्नीशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास एका लाकडी स्टॉलने आधी पेट घेतला आणि तिथून मग आजुबाजुला पसरत गेली. आगीची माहिती कळताच अग्नीशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाण्याचा जोरदार मारा करत ही आग पूर्णपणे विझवली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे