संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

स्वित्झर्लंडमधील क्रेडिट सुसे बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जिनिव्हा – जगातील सर्वांत नामांकित बँकांपैकी एक बँक असलेली स्वित्झर्लंडमधील क्रेडिट सुसे ही बँक सध्या आर्थिक संकटात सापडून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आहे.ही बँक बुडीत निघाल्यास संपूर्ण जग मंदीच्या खाईत लोटले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तसेच या बँकेच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे या बँकेची अवस्था लेहमन ब्रदर्स सारखी होऊ शकते,असा इशाराच आर्थिक तज्ञांनी दिला आहे.

वर्षभरापूर्वी या बँकेचे भागभांडवल २२.३ अब्ज डॉलर्स इतके होते.आता हे भागभांडवल १०.४ अब्ज डॉलर्सवर घसरले आहे.या कंपनीच्या समभागातील मोठ्या घसरणीमुळे कंपनीचे सीईओ उलरीच कॉर्नर यांनी गुंतवणुकदारांना काही दिवसांची मुदत मागितली.क्रेडिट सुसे बँकेचा डिफोल्ट स्वाप वाढून तो १५ टक्क्यांपर्यंत गेला आहे.ही कंपनी स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपली मालमत्ता विकू शकते.असे असले तरी बँकेने मात्र स्पष्ट माहिती दिलेली नाही.तरीही येत्या २७ ऑक्टोंबर रोजी बँकेच्या परिस्थितीचे सविस्तर विवरण समोर आणले जाईल असे बोलले जाते.ही बँक जर दिवाळखोरीत निघाली तर संपूर्ण जागतिक आर्थिक बाजार उध्वस्थ होऊन २००८ पेक्षाही मोठी भयानक मंदीची परिस्थिती निर्माण होण्याची भीती अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami