संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

“स्वाभिमानी’चा ७ नोव्हेंबरला पुणे साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर-गेल्या वर्षीचे २०० रुपये द्या, साखर कारखान्याचे वजन काटे दुरुस्त करून शेतकऱ्यांची फसवणूक आणि पिळवणूक थांबवा या २ प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी ७ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयाला भव्य मोर्चाने धडक देतील, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील २१ व्या ऊस परिषदेत केली. या परिषदेत एकंदर १३ ठराव संमत झाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जयसिंगपूर येथील विक्रम सिंह मैदानावर शनिवारी २१ वी ऊस परिषद आयोजित केली होती. त्यात संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्य कार्यकारिणीचे सदस्य अण्णासाहेब चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत १३ ठराव संमत झाले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी केला. पुन्हा नव्या जोमाने राज्यभर आंदोलन करून सरकारला एफआरपी देण्यास भाग पाडण्याचा निर्णय या परिषदेत घेतला. त्याचाच एक भाग म्हणून ७ नोव्हेंबरला पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयाला शेतकरी भव्य मोर्चाने धडक देणार आहेत. एफआरपीचा फार्म्युला ७ नोव्हेंबरच्या अगोदर ठरवा. गेल्या वर्षीचे २०० रुपये त्वरित द्या. कारखान्यांचे हिशोब करा. अनेक साखर कारखान्यांचे वजन काटे बिघडलेले आहेत. त्यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि नुकसान होत आहे. अशा काट्यांची दुरुस्ती केली पाहिजे. परंतु यात सर्व पक्षांचे राजकीय नेते असल्यामुळे त्याकडे लक्ष दिले जात नाही. म्हणून ७ नोव्हेंबरला साखर आयुक्तांच्या कार्यालयावर शेतकरी भव्य मोर्चाने धडकणार आहेत, असे त्यांनी सांगितले. यावर्षी तुटणाऱ्या उसाला १४ दिवसांत एकरकमी एफआरपी आणि अधिकचे ३५० रुपये प्रति टन पहिली उचल द्या. गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे प्रति टन २०० रुपये मिळावे, या मागणीसाठी हा मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर काढला जाणार आहे. याशिवाय १७ आणि १८ नोव्हेंबरला ऊस तोड रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami