संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

स्वच्छतेत शिर्डीचं साई मंदिर राज्यात अव्वल! पंढरपूर दुसर्‍या क्रमांकावर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिर्डीचे साईमंदिर माझी वसुंधरा अभियानात राज्यात सलग दुसर्‍यांदा अव्वल ठरले आहे. माझी वसुंधरा अभियानात शिर्डी देवस्थानाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे. तर पंढरपूर दुसर्‍या क्रमांकावर आहे. मात्र बाकी सर्वच धार्मिक स्थळे स्वच्छतेच्या बाबतीत उदासीन असल्याचे समोर आलं आहे. राज्यात शिर्डी, कोल्हापूर, जेजुरी, तुळजापूर, पंढरपूर, शेगाव, त्र्यंबकेश्वरसह अनेक महत्त्वाची देवस्थान असून माझी वसुंधरा अभियानात यावर्षी शिर्डी देवस्थानाने बाजी मारली आहे. सलग दुसर्‍या वर्षी प्रथम क्रमांकाचे 3 कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले असून या पुरस्काराची शिर्डी ग्रामस्थांसह साईभक्तांनी स्वागत केले आहे. देशभरातून लाखो भाविक दरवर्षी शिर्डीत हजेरी लावतात. त्यामुळे शिर्डीतील स्वच्छता हे नगरपंचायत समोरील मोठे आव्हान आहे. तरी देखील सलग दुसर्‍या वर्षी शिर्डी नगरपंचायतने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला असून याविषयी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी अधिक माहिती दिली आहे. माजी नगरसेवक सुजय गोंदकर म्हणाले की, हा पुरस्कार शिर्डी ग्रामस्थांचा असून आम्ही केलेल्या कामामुळे मिळालेला पुरस्कार आहे. आमच्या सर्वांना आनंद देणारा आहे.
शिर्डी नगरपंचायतला सलग दुसर्‍या वर्षी 3 कोटींचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami