संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

स्पेनने संताप जनक क्षुल्लक कारण देत भारतीय कुस्तीपट्टूंना व्हिसा नाकारला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मद्रिद – स्पेनच्या पोंटेविड्रा येथे “अंडर-२३ वर्ल्ड चॅम्पियनशिप’ कुस्ती स्पर्धा होणार आहे. १७ ते २३ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज केलेल्या २१ भारतीय पहिलवानांना स्पेन दूतावासाने व्हिसा नाकारला आहे. त्यासाठी त्यांनी दिलेले कारण संतापजनक आहे. स्पर्धा संपल्यानंतरही भारतीय पहिलवान स्पेन सोडणार नाहीत, अशी शंका असल्यामुळे व्हिसा नाकारल्याचे धक्कादायक कारण त्यांनी दिले आहे. यामुळे भारतीय कुस्ती महासंघाची डोकेदुखी वाढली आहे. संघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी याविषयी आश्चर्य व्यक्त केले आहे. यापूर्वी कधी असा प्रकार घडला नव्हता, असे त्यांनी सांगितले.
स्पेनमधील “अंडर-२३ वर्ल्ड चॅम्पियन’ कुस्ती स्पर्धेसाठी भारतातून ३० पैलवानांनी व्हिसासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ९ जणांना व्हिसा मिळाला. मात्र २१ जणांचा व्हिसा नाकारला. त्यासाठी स्पेनने अजब कारण दिले आहे. स्पर्धा संपल्यानंतरही भारतीय कुस्तीपटू स्पेन सोडणार नाहीत, अशी शंका असल्यामुळे व्हिसा देता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकारावरून भारतीय कुस्ती महासंघाने ही संताप व्यक्त केला आहे. पदकांचे प्रबळ दावेदार असलेल्या खेळाडूंना व्हिसा नाकारला आहे. त्यात प्रशिक्षकांचाही समावेश आहे. स्पेनच्या या कृत्याचा क्रीडा विश्वातून निषेध केला जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami