नागपूर – शहरातील गिट्टीखदान भागात काल सायंकाळी पाच वाजण्याच्या मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली. एक भरधाव स्कार्पिओ गाडी रस्त्यावरून थेट भिंत फोडून घरात घुसली. यावेळी भिंत अंगावर पडून एकाआठ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. स्कॉर्पिओ गाडीतील पाचजण जखमी झाले.
विक्की ऊर्फ जॉर्डन फिलिप जोसेफ (८) असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी गाडी चालक भूपेंद्र शिवणकर याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गाडी मध्ये चार ते पाच जण होते. ते सुद्धा जखमी झाले.त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. या परिसरात अगदी उताराचा असा हा रोड आहे. मृत मुलगा घरामध्ये फुटबॉल आणण्यासाठी गेला होता. तो फुटबॉल घेऊन घरातून बाहेर पडत असतानाच ही अपघाताची घटना घडली.