सोलापूर : विद्यापीठाने निकालात केलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ अभाविपने पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात आंदोलन केले. गनिमी काव्याने हे आंदोलन कुलगुरूंच्या केबिनबाहेर करण्यात आले.त्यामुळे विद्य़ापीठ सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. विद्य़ापीठाच्या निकालात अनेक त्रुटी, वारंवार निवेदन देऊनही दुरुस्ती नसल्याने कुलगुरुंच्या दालनासमोर अभाविपकडून शुद्धीकरण प्रक्रिया करत आंदोलन करण्यात आले.
सोलापूर विद्यापीठातील मार्च २०२२ या परिक्षेचे विविध विभागांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे याही निकालात विद्यापीठाचा सावळा गोंधळ समोर आला. त्यावर शिक्षकांना विचारले असता विद्य़ार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्यामुळे आज कुलुगुरूंच्या केबिनजवळ अभाविप गनिमी काव्याने पोहोचले असून शुद्धीकरण प्रक्रिया करत आंदोलन केले. याशिवाय विद्याापीठाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान,ऑनलाईन निकालामध्ये निकाल लागला परंतु विद्यार्थ्यांचे नावच गायब झाले आहेत. तर काही निकालांमध्ये विद्यार्थी परिक्षेला हजर असताना त्यांचा निकाल हा सर्वच विषयाच्यावेळी गैरहजर दिसून येत आहेत.तसेच काही जणांचे सर्वच विषय अनुत्तीर्ण असे लागले आहेत. याशिवाय लागलेला निकाल कोणत्या विभागाचा आणि कोणाचा असा प्रश्न विद्य़ार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण, विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसानीचे सत्र कधी थांबणार आहे,असा सवाल विद्य़ार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला. याबाबत चौकशी केली असता शिक्षकांनी विद्यार्थ्य़ाच्या अडचणी सोडवण्याएवजी उलट आम्हाला काही माहित नाही.निकाल हा आम्ही लावला नसून तो परिक्षा विभागाने लावला असल्याची उत्तरे देण्यात आल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.