सोलापूर – भारतीय रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस अनेक मार्गावरुन जात आहे.आता वंदे भारत एक्स्प्रेस ही मुंबई-पुणे-सोलापूर या मार्गावर धावणार आहे. ही गाडी पुणे-सोलापूर हे अंतर अवघ्या तीन तासांत पार करणार आहे.
मुंबई – सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची काल गुरुवारी यशस्वी चाचणी पार पडली. १० फेब्रुवारीपासून वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते सोलापूर या मार्गावर धावणार आहे. सोलापूरवरुन मुंबईला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी काल या रेल्वे गाडीची चाचणी पार पडली आहे.ताशी १३० किलोमीटर वेगाने ही गाडी धावणार आहे.१० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते सोलापूर दरम्यान ताशी १३० किमी वेगाने धावणार आहे.ती पुण्यातून जाणार असल्याने पुणेकरांना ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा प्रवास अनुभवता येणार आहे.