संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा व कर्नाटकला भूकंपाचे हादरे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोलापूर- सोलापूर, पंढरपूर आणि उत्तर कर्नाटकच्या काही भागांत आज सकाळी ६ वाजून २४ मिनिटांच्या सुमारास सौम्य भूकंपाचे हादरे जाणवले. ४.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर कर्नाटकच्या विजयपूरमध्ये होता. भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असतानाच आज सकाळी ६ वाजून २४ मिनिटे आणि ४० सेकंदांनी सोलापूर जिल्ह्याला सौम्य भूकंपाचा हादरा बसला. मंगळवेढा, रामवाडी, पंढरपूर आदी भागांत भूकंप जाणवला. त्याची तीव्रता ४.९ रिश्टर स्केल नोंद झाली. उत्तर कर्नाटकच्या विजयपूरमध्ये १० किलोमीटर जमिनीखाली त्यांचा केंद्रबिंदू होता. राज्याच्या काही भागांत अतिवृष्टी होत असल्यामुळे भूकंपात काही हानी झाली का याची माहिती जिल्हा प्रशासनाने घेतली. मात्र त्यात कुठेही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami