संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

सोलापूरच्या भाजपा आमदाराला पीएफआयकडून धमकीचे पत्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोलापूर – सोलापूर शहरातील भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआयकडून जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र पोस्टाने प्राप्त झाले आहे. यामुळे शहरात व भाजप गोटात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश देत क्राईम ब्रँचकडे तपास सोपविला आहे.
मोहम्मद शफी बिराजदार (रा.सहारा नगर, नई जिंदगी, मजरेवाडी सोलापूर) या इसमाने स्वतःच्या अक्षरात १ ऑक्टोबर रोजी पोस्टाने हे पत्र आमदार विजयकुमार देशमुख यांना पाठवले आहे. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी ६ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त यांना भेटून पत्र पोलिसांच्या हवाली केले आहे.याची गंभीर दखल घेत, आलेल्या पत्राबाबत सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहे.दरम्यान,राज्यात व देशभरात पीएफआय या संघटनेच्या ठिकठिकाणीच्या कार्यालयावर एनआयएचे छापे पडले आहेत. पीएफआयच्या अनेक कार्यकर्त्यांच्या राहत असलेल्या घरावर छापे मारून प्रतिबंधात्मक कारवाई केली.सोलापुरात सुद्धा पीएफआयच्या संघटनेच्या एका कार्यकर्त्यावर कारवाई करून करून त्याला ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच सोलापुरातील भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआयच्या कार्यकर्त्याकडून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले,असल्याची माहिती आमदार विजय देशमुख यांनी पोलीस आयुक्तांना दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami