सोलापूर- बारावी आणि दहावी बोर्डाच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील १,०८९ माध्यमिक शाळांमधील ४,५०,००० तर प्राथमिक शाळांमधील २,१५,००० विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा १२ एप्रिलपर्यंत घेण्यात येणार असून त्यांनतर उन्हाळी सुट्ट्यांना सुरुवात होणार आहे.
उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांचे वेध लागले आहेत. सोलापूर मधील माध्यमिक शाळांतील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांना ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. तर, १२ एप्रिलपर्यंत त्या संपवण्यात येणार आहेत, असे नियोजन येथील अनुदानित माध्यमिक शाळांनी केले आहे. दरम्यान, शाळांना १ मेपासून उन्हाळी सुट्टी असणार आहे. त्यानंतर १२ जूनपासून २०२३-२४ या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे.