संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

सोने-चांदी झाली आणखी स्वस्त ७ महिन्यांतील निचांकी पातळीवर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घट होत आहे. याचाच परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरापासून भारतीय बाजारपेठेत सोने-चांदी दरात घसरण होत आहे.दरम्यान, बुधवारी दरात तेजी आल्यानंतर आज गुरूवारी सोन्याचे दर पुन्हा घसरले आहे.
भारतीय सराफा बाजारात सोन्याचा भाव ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यापारात ०.२१ टक्क्यांनी घसरली आहे.सोन्याबरोबर चांदीचे दरही घसरले असून गुरुवारी चांदीचा दर १७२ रुपयांनी घसरून ५७,१२६ रुपये किलो झाला आहे. आज गुरुवारी बाजारपेठ उघडताच २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा वायदे भाव प्रतितोळा १०५ रुपयांनी घसरून ४९,३३८ रुपयांवर पोहचला. फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा व्यवहार ४९,३१४ रुपयांच्या पातळीवरून सुरू झाला. काही वेळातच सोनाचा भाव प्रतितोळा ४९,३१४ रुपयांच्या पातळीवर पोहचला होता. मात्र, नंतर त्यामध्ये घसरण झाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami