संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

सोनिया गांधी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – 2 जून रोजी कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजधानीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, त्यांना कोरोनाशी संबंधित समस्या येत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सोनियांच्या तब्येतीबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले की, सोनिया गांधींची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयात निरीक्षणासाठी ठेवण्यात आले आहे.

कोरोना होण्यापूर्वी सोनिया गांधी नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेत होत्या. त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. सोनियांना 1 जूनच्या संध्याकाळी सौम्य ताप आला आणि त्यात कोरोनाची काही लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या नेत्यांनी ट्विट करून सोनिया गांधींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami