संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 22 March 2023

सोनिया गांधींनी निवृत्तीचा निर्णय घेतलेला नाही!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रायपूर – छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेसच्या ८५व्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस होता. या अधिवेशनात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे, असे विधान केले. या विधानानंतर सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होणार का? असे प्रश्न विचारले जात होते. यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या अल्का लांबा यांनी सांगितले. सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होणार नाहीत.

काँग्रेस अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या प्रवक्त्या अल्का लांबा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोनिया गांधींनी केलेल्या विधानाबाबत सविस्तर माहिती दिली. लांबा म्हणाल्या, सोनिया गांधी यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढू नये. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. आगामी काळातही त्या हा निर्णय घेणार नाही, असे सोनिया गांधी यांनी सांगितले आहे, अशी माहिती अल्का लांबा यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या