संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

सेवा शुल्क देणे पूर्णपणे ऐच्छिक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

दिल्ली- केंद्रिय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांद्वारे हॉटेल किंवा उपाहारगृहात ग्राहकांना सेवा शुल्क भरण्यास भाग पाडू शकत नाही. सदर सेवा शुल्क ऐच्छिक असल्याचे या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे. एखाद्या हॉटेलने अशी सेवा शुल्क देण्याची सक्ती केली तर ग्राहक त्याची थेट तक्रार करू शकतो. खाद्यपदार्थांच्या बिलासोबत समावेश करून आणि एकूण रकमेवर जीएसटी लावून ग्राहकांकडून सेवा शुल्क घेता येणार नाही.

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या १९१५ या क्रमांकावर संपर्क साधून अथवा एनसीएचच्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून तक्रार दाखल करू शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा मदतीने तक्रार निवारणासाठी ई-दाखील पोर्टलवर www.e-daakhil.nic.in इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेदेखील तक्रार नोंदविता येईल. तसेच तक्रार नोंदविण्यासाठी com-ccpa@nic.in येथे ई-मेल देखील करता येईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami