संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

सूर्य हसताना दिसला!  नासाच्या फोटोची चर्चा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

न्यूयॉर्क- या जगातील कोणीही सूर्याजवळ जाऊ शकत नाही.कारण सूर्य हा तप्त आगीचा गोळा असतो. असे मानले जाते. त्यामुळे सूर्याजवळ जो कोणी जाईल तो क्षणार्धात खाक होईल असे म्हटले जाते.पण पृथ्वीवर जीवसृष्टी असण्याचे सर्वात मोठे कारण सूर्य आहे,आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी सूर्याकडे पाहतो. तेव्हा त्याची वेगवेगळी रूपे आपल्याला पाहायला मिळतात.पण तुम्ही
याच सूर्याला कधी हसताना पाहिले आहे का? पण असे घडले आहे. पहिल्यांदाच नासाच्या उपग्रहाने सूर्याचे हसतानाचे छायाचित्र कॅमेरात कैद केले आहे.

गुरुवारी सकाळी नासाच्या उपग्रहावरून हे छायाचित्र घेण्यात आले. फोटो शेअर करताना नासाने कॅप्शन दिले आहे की, ‘आज नासाच्या सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरीने सूर्याला हसताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. अल्ट्राव्हायोलेट प्रकाशात दिसणारे, सूर्यावरील हे गडद ठिपके कोरोनल होल म्हणून ओळखले जातात आणि तिथे तीव्र सौर वारे अवकाशातून वाहतात.या छायाचित्राकडे बारकाईने पाहिल्यास तो आपल्याच कडे पाहून हसत असल्याचे दिसते. नासाच्या सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरीमधून काढलेले हे छायाचित्र पाहता असे दिसते की त्याचे दोन गडद डोळे, एक गोल नाक आणि हसरी मुद्रा
आहे.२०१० मध्ये नासाने सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरी  लाँच केली होती. तेव्हापासून ते अंतराळात फिरत आहे आणि सूर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. याचा उपयोग अवकाशातील हवामानाचा अभ्यास करण्यासाठी आणि ताऱ्यांच्या स्थिती आणि होणारे स्फोट यांचा मागोवा घेण्यासाठी केला जातो.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami