संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 01 February 2023

सुशांत सिंग राजपूतचा फ्लॅट
अडिच वर्षांपासून रिकामाच

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई-अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी ज्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली, त्याबद्दल एक वेगळीच माहिती उघड झाली आहे. सुशांतचा मुंबईतील हा फ्लॅट गेली अडीच वर्षं भाड्याने द्यायचा म्हणून रिकामा असून रियल इस्टेट ब्रोकर रफीक मरचंट यांनी नुकताच या सी फेसिंग फ्लॅटची एक छोटीशी क्लिप पोस्ट केली आहे आणि या फ्लॅटचे 5 लाख रुपये प्रती महिना एवढे भाडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
रफीक मरचंट यांनी स्पष्ट केली आहे की, ‘या फ्लॅटचे मालक देशाच्या बाहेर राहतात आणि ते हा फ्लॅट कोणत्याही बॉलिवूड कलाकाराला देण्यास इच्छुक नाहीत. सध्या तरी त्यांना या फ्लॅटसाठी एखाद्या कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या भाडेकरूची गरज आहे. लोक या घरात यायला घाबरत आहेत. सुशांतच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर हा फ्लॅट पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा कमी झाली आहे. घरमालकही फ्लॅटची किंमत खाली आणायला तयार नाही, तसे झाले तर हा फ्लॅट नक्की विकला जाईल. सुशांत याच घरात राहायचा याचा काही लोकांना अजिबात फरक पडत नाही, मात्र नंतर त्यांचे मित्र नातेवाईक हे त्यांचे मतपरिवर्तन करतात.` असे रफीक मरचंट यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami