संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

सुला वाइनयार्ड्स आयपीओ आणणार; बाजारातून १,४०० कोटी जमवणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – नामांकित ब्रँड अशी ओळख असलेल्या नाशिकच्या सुला वाइनयार्ड्स कंपनीने आयपीओ आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातून १,२०० ते १,४०० कोटींचे भांडवल जमा केले जाणार आहे. त्यासाठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली जाणार आहेत. कंपनीच्या १३ पेक्षा जास्त ब्रँडची विक्री भारतातील २४ राज्यांमध्ये होते. हा आयपीओ सप्टेंबर २०२२ मध्ये येण्याची शक्यता आहे.

नाशिकच्या सुला वाइनयार्ड्स कंपनीचे बाजारात १३ पेक्षा अधिक ब्रँड आहेत. चांगल्या दर्जाची वाईन अशी तिची ख्याती आहे. सुलाकडे २,००० एकरपेक्षा जास्त द्राक्ष बागांचे व्यवस्थापन आहे. नाशिक, दक्षिण महाराष्ट्र व कर्नाटकच्या शेतकऱ्यांसोबत कंपनीने करार केले आहेत. ही कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. १,२०० ते १,४०० कोटींच्या दरम्यान हा आयपीओ असेल. त्यासाठी कंपनीने बँकर्स म्हणून कोटक महिंद्रा, सीएलएसए, आयआयएफएल यांची नियुक्ती केली आहे. शेअरचा नवीन इश्यू आणि गुंतवणूकदारांकडून विक्रीची ऑफर यांचा त्यात समावेश असेल. सुला वाइनमध्ये आधीच भाग घेतलेले अनेक पीई गुंतवणूकदार आहेत. त्यात डीएसजी, एव्हरस्टोन कॅपिटल, सामा कॅपिटल, व्हरलिन्व्हेस्ट आदींचा समावेश आहे. आयपीओसाठी कंपनी सेबीकडे कागदपत्रे दाखल करणार आहे. त्यानंतर २-३ महिन्यांत सेबीची मंजुरी मिळेल. म्हणजे सप्टेंबर २०२२ मध्ये सुला वाईनचा आयपीओ येण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami